ठाणे (जिमाका):- मराठी भाषेतील उत्कृष्ठ वाड:मय निर्मितीसाठी राज्य शासनाच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार योजना जाहीर झाली असून यासाठी प्रवेशिका ३१ जानेवारी २०२० पर्यंत पाठवाव्यात असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिवांनी केले आहे. __ मराठी भाषेतील उत्कृष्ठ वाड:मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०१९ करिता राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणा- या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारासाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून) तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक ३१ जानेवारीपर्यंत पाठविता येणार आहेत. दिनांक १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. __ या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रविंद्र नाटय मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड प्रभादेवी मुंबई ४०००२५ यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी जानेवारीपर्यंत प्रवेशिका पाठवण्याचे यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामुल्य उपलब्ध होतील. महाराष्ट्र शासनाच्या www. maharashtra.gov.in या वेबसाईटवर नविन संदेश या सदरात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार २०१९ नियमावली व प्रवेशिका या शिर्षाखाली व Whats new Late Yashwantrao Chavhan State Liter ature Award 2019 Rules Book and Application Form या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या https://sahitya. marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णत: भरून आवश्यक कागदपत्रांसह सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात ३१ जानेवारीपर्यंत पोहचतील अशा पाठवण्याचे आवाहन पाठवाव्यात. लेखक/प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करू शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्हयातील लेखक/प्रकाशकांनी पुस्तकाच्या दोन प्रतींसह विहीत नमुन्यातील प्रवेशिका सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रविंद्र नाटय मंदीर इमारत दुसरा मजला, सयानी रोड प्रभादेवी मुंबई ४०००२५ येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाण च्या लेखक /प्रकाशकांनी संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी कार्याल यामध्ये प्रवेशिका व पुस्तकांच्या दोन प्रती दिनांक ३१ जानेवारीपर्यंत पाठवाव्यात. लेखक/प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफया वर / पाकिटावर स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार २०१९ साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दिनांक ३१ जानेवारी हा राहील.
स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारासाठी ३१ जानेवारीपर्यंत प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन