आजी माजी सैनिकांना मालमत्ता करात सुट

ठाणे (जिमाका):- ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत वास्तव्यास व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय ठाणे यांच्याकडे | नोंदणीकृत असलेल्या सर्व आजी/ माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांना मालमत्ता करात सुट देण्यात येत आहे. त्याकरिता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे यांच्याकडून नोंदणीकृत माजी सैनिकांची यादी ठाणे महानगरपालिका यांना माहे जानेवारी २०२० अखेर पुरविणे गरजेचे असून ज्या लाभार्थ्यांची नावे | यादीमध्ये असतील अशा लाभार्थीच्या बिलामध्ये प्रत्यक्ष सुट देण्यात येणार आहे.जे आजी/माजी सैनिक, माजी सैनिक विधवा या सवलतीचा फायदा घेऊ इच्छितात त्यांनी जिल्हा करात सुट सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे यांच्याकडे नोंदणी तसेच मालमत्तेशी संबंधित लाभार्थीची नावे व मालमत्ता देयक संबंधित लाभार्थीच्या नावे असणे अशा कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे. ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत वास्तव्यास असलेल्या सर्व आजी/माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांनी सर्व कागदपत्रांच्या पुराव्यासहित सैनिकी मुलांचे वसतीगृह, ज्ञानसाधना कॉलेजच्या मागे, धरमवीर नगर, नौपाडा ठाणे४ ० ० ६ ० १ ( Mob9769664830) येथे कार्यालयील कामकाजाच्या वेळेस संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे यांनी केले आहे.