उद्योग व्यवसायाला मिळणार संजिवनी

भिवंडी(प्रतिनिधी) :- भिवंडी तालुक्यातील विविध नागरी समस्यां कडे तत्कालीन भाजप सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे जनता मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. बुलेट ट्रेनसाठी शेतक-यांच्या जमिनी संपा दित केल्या जात आहेत. मुबलक प्रमाणात जमिनीचा मोबदला मिळणे आवश्यक आहे असे असताना केंद्र सरकार त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग देशोधडीला भिती निर्माण झाली आहे. त्यासोबतच तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य लगतच्या ३८ गावांना पर्यावरण संरक्षण क्षेत्र (ईको सेंसिटिव्ह) लागू केला आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या उद्योग, व्यवसायावर बंदी आली आहे. त्यामुळे या परिसरात बेरोजगारी वाढणार असल्याने स्थानिक नागरिकांचे अतोनात नुकसान होणार आहे. राज्य शासनाने या प्रकरणी लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव चौघुले, भिवंडी तालुका ध्यक्ष गणेश गुळवी, ज्येष्ठ कार्यकर्ते कमलाकर टावरे यांच्या शिष्टमंड ळाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांच्याकडे विविध सम स्यांचा पाढा कथन केला. यंत्रमाग उद्योगाची नगरी म्हणून भिवंडी शहर ओळखले जात आहे त्यामुळे कामगारांची वस्ती मोठया संख्येने येथे आहे. मात्र तत्कालीन भाजप सरकारने यंत्रमाग व्यवसायाकडे दुर्लक्ष केल्याने हा व्यवसाय पुर्णत: डबघाईला आला असून कामगार देशोधडीला लागला आहे. भिवंडी शहरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. तसेच तालुक्यातील तुंगारेश्वर अभयारण्यालगतच्या ३८ गावांमधील वीटभटटी, दगडखाण, स्टोन क्रशर, डांबर प्लांट आदी व्यवसाय बंद झाले आहेत. त्यामुळे येथील स्थानिकांवर उपासमारीची पाळी ओढवली आहे.या व्यवसायासाठी स्थानिक व्यावसायिकांनी बँकांकडून कर्जे घेतली आहेत. मात्र उद्योग बंद झाल्याने बँकांचे हप्ते कसे फेडायचे? या विवंचनेत व्याव सायिक सापडले आहेत. ईको सेन्सिटिव्ह लागू करताना स्थानिकां ची बाजू समजून घेतलेली नाही. त्यामुळे यावर तोडगा काढण्या साठी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष : महादेव चौघुले यांच्या नेतृत्वाखाली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची : भेट घेऊन कैफियत मांडली. : यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार : यांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांचे प्रधान : सचिव विकास खर्गे यांच्याशी : संपर्क करून भिवंडीतील नागरी - समस्या सोडवण्यासाठी निर्देश - दिले. त्यानूसार खर्गे यांनी ठाणेजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना लक्ष घालून मार्ग काढण्याचे आदेश : दिले आहेत. त्या आदेशानुसार जिल्हाधिका-यांनी पुन्हा ३८ । गावांचे सर्वेक्षण करून उद्योग व्यवसायाची १ किमीची मर्यादा ! १०० मीटरवर येण्याची शक्यता - असल्याने लवकरच येथील उद्योग | पुन्हा सुरू होण्याची आशा पल्लवित | झाली आहे.