ठाणे (जिमाका):- समाज कल्याण विभागाच्या वतीने धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरीता पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत ठाणे जिल्हया तील सर्व महाविद्यालयामधील इयत्ता १२ वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमासाठी महावि द्यालयामध्ये प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतू शासकिय वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळाले ल्या धनगर समाजातील (भटक्या जमाती-क) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सदर योजनेंतर्गत उच्च शिक्षणा साठी भोजन भत्ता २५ हजार रूपये, निवास भत्ता १२ हजार रूपये व निर्वाह भत्ता ६ हजार रूपये असे एकूण ४३ हजार रूपये रक्कमेचा लाभ व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी या योजनेचा लाभ घेण्याकरीता इयत्ता १२ वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण |तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यास | क्रमाच्या महाविद्यालयामध्ये | केंद्रीभूत प्रवेश घेतलेला असावा, | विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेवरच केली जाईल तसेच उपाध्याय स्वयम योजना अभ्यासक्रमाच्या मध्यावधी प्रवेश घेतलेले विद्यार्थी देखील या योजनेस पात्र असतील. । दयार्थ्याने आदिवासी | विभाग, सामाजिक न्याय विभाग | किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या | वसतीगृहामध्ये प्रवेश घेतलेला | नसावा, तसेच विद्यार्थी हा कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा | व्यवसाय करत नसावा. एका | विद्यार्थ्यास जास्तीत जास्त ५ वर्षे | या योजनेचा लाभ घेता येईल, तसेच | त्यासाठी विद्यार्थ्याचे वय २८ | वर्षापेक्षा जास्त नसावे, धनगर | समाजातील अपंग विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ प्राधान्याने देण्यात येईल, विद्यार्थ्यांची महाविद्यालया | _तील उपस्थिती किमान ६० टक्के | असणे बंधनकारक आहे. तरी ठाणे | | जिल्हयातील धनगर समाजातील | | जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांनी या | योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन | सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण | ठाणे बलभीम शिंदे यांनी केले आहे.
धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयम योजना