भिवंडी(प्रतिनिधी):- दिल्ली विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर होताच केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या किमतीत तब्बल दीडशे रूपयांनी वाढ केली असून त्या विरोधात देशभरा त महिलांमधून संताप व्यक्त होत असतानाच भिवंडीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या | स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली | उपविभागीय कार्यालयासमोर | डोक्यावर गॅस सिलेंडर, लाकडाची मोळी घेऊन जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने आंदोलन गुरूवारी करण्यात आले. त्यानंतर शिष्ट मंडळाने उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांच्याकडे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नावे असलेले निवेदन देऊन वरूनया गॅस दरवाढीचा निषेध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला विभागातर्फे आयोजित या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भगवान टावरे, कार्यकर्ते हारून खान, महिला उपाध्यक्ष शेख रहमत अलीम, सबीना नुर अली, सुल्ताना रिजवान, ललिता पांचाळ, नौशीन पटेल, नसीम मोमीन, रजिया परवीन, सिध्दीकी सबरे आलम, शेख मुनीर यांसह असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.
घरगुती गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने निदर्शने