भिवंडी(प्रतिनिधी):- विधान सभा निवडणूकीत भिवंडीत भाजप ला सोडचिठठी देत काँग्रेसचा हात पकडणा-या संतोष शेटटी यांनी पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केला असून नवी मुंबई येथील भाजपा राज्य अधिवेशनादरम्यान प्रदेशा ध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संतोष शेटटी यांना पक्षात पुन्हा प्रवेश देऊन त्यांच्यावर लागलीच भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी विरोधी प णवीस यांनी सोपविली आहे. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रा तील एक महत्त्वाचे सत्ताकेंद्र म्हणून संतोष शेटटी हे ओळखले जात असून २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास सोडचिठठी देत भाजपाकडून निवडणूक लढविली होती त्या निवडणूकीत तीन हजार मतांनी पराभव झाल्यानंतर भिवंडी शहरात भाजपा शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळताना शहरात पक्ष संघटना वाढीस विशेष प्रयत्न केले. परंतू २०१९ च्या निवडणूकीत भाजपा सेना युतीमुळे संतोष शेटटी यांनी काँग्रेस पक्षाची साथ घेत निवडणूक लढले परंतू त्यानंतर पुन्हा एकदा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवी मुंबई येथील राज्य अधिवेशन कार्यकर्ता मेळाव्यात त्यांना भाजपा पक्षप्रवेश देण्यासाठी आमंत्रित केले असता प्रभारी शहराध्यक्ष पाटील यांच्या सह कार्यक्रमस्थळी पोहचले. या अधिवेशन कार्यक्रम प्रसंगी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या शुभहस्ते संतोष शेटटी यांना भाजपात पक्ष प्रवेश दिला तर माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचक्षणी भिवंडी शहर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांच्यासंघटन कौशल्यास पसंती दिली आहे.
संतोष शेटटी यांची भाजपात घरवापसी तात्काळ शहराध्यक्ष पदी नियुक्ती