भिवंडी(प्रतिनिधी):- भिवंडी शहरातील मुख्य रस्त्यांची दुरावस्था झाल्याने एमएमआरडीए व पालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे काँक्रीटीकरणा मुळे या रस्त्यांवरील व्यापारी तसेच नागरिकांनी केलेले अति क्रमण पालिका प्रशासनाच्या वतीने हटविण्यात आले आहे. त्यामुळे येथील रस्ते मोकळा श्वास घेतील अशी आशा स्थानिक नागरिक व्यक्त करीत होते मात्र भाजी विक्रे त्यांसह अवैधरित्या अतिक्रमण करणा-या व्यापा-यांनी या काँक्रा ट रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण करण्यास सुरूवात केली असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीच्या सम स्यांना पुन्हा सामोरे जावे लागणार आहे. _ शहरातील पदमानगर येथील भाजी मार्केट रस्त्याचे काँक्रीटीकर णाचे काम सध्या सुरू असून या रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमण पालिका प्रशासनाने हटवून हा रस्ता मोकळा केला. सध्या या रस्त्याचे काम सुरू असून या निर्माणाधीन रस्त्यावरच भाजी विक्रेत्यांनी पुन्हा आपले बस्तान बसविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे भविष्यात स्थानिक नागरिकांना मोठया अडचणींचा सामना करावा लागणार आहे.एकीकडे मनपा प्रशासनाने मोठा गाजावाजा करत या रस्त्या वरील अतिक्रमण हटवले होतेमात्र आता भाजी विक्रेत्यांनी पुन्हा आपले बस्तान या रस्त्यावर मांडले असता या भाजी विक्रेत्यांकडे जाणीवपुर्वक डोळेझाक होत असल्याची शंका स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेतविशेष म्हणजे या रस्त्यावर काँक्रीट मजबूत होण्यासाठी पाणी साचून राहण्यासाठी बनविले जाणारे गाळे सुध्दा येथील भाजी विक्रेते तोडून आपल्या बसण्या साठी सोयीस्कर जागा करीत असल्याने भविष्यात हा रस्ता वापरण्यास सुरूवात झाल्यानंतर येथील रस्ता रुंदीकरण व काँक्रीटी करण हे नक्की वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी की येथील भाजी विक्रेते यांना ऐसपैस जागा मिळावी यासाठी केले आहे असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
पढमानगर येथील निर्माणाधिन काँक्रीट रस्त्यावर भाजी विक्रेत्यांचा कब्जा, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष