भिवंडी(प्रतिनिधी):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देह ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीहून नागपूर व त्यानंतर मुंबईला आणून डॉ. भदंत आनंद कौशल्यायन यांनी आणले व त्याची माहिती संपुर्ण ठिकाणी दिली. ज्या नागरिकांना नागपूर येथे धर्मांतरासाठी जाता आले नाही त्या उर्वरित नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चितेला साक्षी ठेवून बौध्द धम्माची दिक्षा डॉ. भदंत आनंद कौशल्यायन यांनी दिली असे डॉ. भदंत आनंद कौशल्यायन यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त दिपंकर विपश्यना मेमोरीयल ट्रस्टद्वारा धम्मराजिक कासणे (वासिंद) आणि राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील कासणे धम्मराजिक महाविहार विपश्यना सेंटर येथे धम्म परिषद आणि थायलंड येथून आणलेली साडेसात फुट उंच असलेली मुर्तीची प्रतिष्ठापना, विद्यालंकार ग्रंथालयाचे उदघाटन, विपश्यना हॉलचे उदघाटन, डॉ. भदंत आनंद कौशल्यायन यांच्या स्तुपाचे भूमिपूजन संघनायक डॉ. भदंत आनंद महाथेरो, जागेश सोमकुवर, रघुनाथ कारगावकर, डॉ. बी आर आंबेडकर विश्वविद्यालयाचे पर्व कुलगुरू सी डी नाईक, डी बीधांडे, दिपंकर विपश्यना मेमोरीयल ट्रस्टचे अपयशात विरोधी नारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गौतमबुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार उपस्थित मान्यवरांना सांगण्यात आले. तर डॉ. भदंत आनंद कौशल्यायन यांच्या शिष्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचे काम केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यावेळी राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे सहकार्य लाभले. थर यावेळी ठाणे, रायगड, मुंबई येथून नागरिकांनी कार्यक्रमासाठी गर्दी केली होती. महाराष्ट्र शासनाच्या वतीने कासणे विपश्यना सेंटरला पर्यटन स्थळ क चा दर्जा देऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक नागरिक या ठिकाणी भेट देत असतात. डॉ. भदंत आनंद कौशल्यायन त्यांच्या अस्थिकलशावर स्तूप बांधण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. तर विपश्यना सेंटर व बौध्द भिक्षू सेंटर लवकरच सुरू करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे असे कासणे दिपंकर विपश्यना मेमोरीयल ट्रस्टचे अध्यक्ष भदंत विनयबोधी महाथेरो यांनी बोलताना सांगितले.
कासणे येथेधम्मपरिषद आणि उदघाटन सोहळा संपन्न