भिवंडी(मिलिंद जाधव):- हल्लीच्या विज्ञानयुगात भ्रमणध्वनी च्या गजराने सुरू होणारी पहाट पुर्वीच्या काळी नंदीबैलाच्या गुबूगु बूने होत असे. काळानुसार याबाबी आता दुर्मिळ होत चालल्या असता नाच गुरूवारी तालुक्यातील जिल्हा परिषद वांद्रे या शाळेच्या विद्यार्थ्यां नी शाळेच्या प्रांगणात नंदीबैलाच्या खेळाचा आनंद घेतला. नंदीबैल दिसताच गावक-यांनी व विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात नंदी बैलाच्या खेळाचा आनंद घेतला. नंदीबैल दिसताच गावक-यांनी व विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. आपल्या धन्याच्या इशा-यावर मान डोलावून अनेक प्रश्नांची उत्तरे नंदीबैलाने दिली. हा नंदीबैलाचा खेळ पाहण्यासाठी शाळेच्या १३७ विद्यार्थ्यांसोबत शाळाव्यवस्थापन समिती सदस्य पालक, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.शांना काळाच्या ओघात सध्या नंदी बैल | दिसेनासे झाले आहेत. आधुनिक | तेच्या जमान्यात नंदी बैल ही संस्कृ तीचा लोप पावत चालल्याचे दिसून येत आहे. परंतू नंदीबैल आल्याने | वांद्रे गावात पुन्हा एकदा आपल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. भिवंडी तालुक्यातील वांद्रे वा गावात हा नंदीबैल आला असताना शाळेच्या पटांगणात त्याना बोलावून विद्यार्थ्यांना नंदी बैलाबाबत प्रत्यक्ष अनुभूती व माहिती मिळाली.विशेष म्हणजे यावेळी नंदीबैल आल्याने मुलांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळाले. विद्यार्थ्यांना प्राणी व मानव यातील सामाजिक महत्त्वाची माहिती व जाणीव करून देण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता सुर्यवंशी, शिक्षिका वृषाली विसपुते, सुजाता दोंदे, शिक्षक गणेश गायकवाड तसेच शाळाव्यवस्थापन समिती सदस्य पालक, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
वांद्रे शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवला नंदीबैलाचा खेळ