शासकिय कर्मचा-यांनी सहानभतीचा दष्टीकोन ठेवणे आवश्यक-जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

ठाणे(जिमाका):- शासकिय सेवेत असताना प्रत्येक कर्मचा- याने सहानुभूती आणि मदतीची भावना ठेवून काम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले. ठाणे जिल्हया तील १० मयत कर्मचा-यांच्या वारसांना शासकिय सेवेत सामा वून घेण्यात आले आहे या सर्व वारसांना नियुक्तीपत्र जिल्हाधि कारी यांच्या हस्ते आज देण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिका री वैदेही रानडे, निवासी उपजिल्हा धिकारी डॉ. शिवाजी पाटील, उप जिल्हाधिकारी अभिजित भांडे, चिटणीस राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी कर्मचा-यांच्या सेवाविषयक बाबींचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांना दिल्या होत्या. त्यानुसार सर्व यंत्रणेने प्राधान्याने या सर्व बाबींची पुर्तता केली. जिल्हाधिकारी ठाणे आस्थापने वरील कर्मचा-यांचे स्थायी आदेश, आश्वासित सेवा योजनेअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे १०, २०, ३० वर्षाचे लाभ पात्र कर्मचायांना देण्यात आले. कर्मचा-यांचे प्रश्न तातडीने सोडविल्याबददल ठाणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिका-यांचे आभार मानले. जिल्हयातील सर्व कर्मचा-यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून चांगले काम करावे असे आवाहन नार्वेकर यांनी यावेळी केले.