__ भिवंडी(प्रतिनिधी):- केंद्र शासनाने एक हजार व पाचशे रूपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या असतानाही एक कोटी रूपयांच्या चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा बाळगल्याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी सोमवारी रात्री दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. __ गोपाळ माधव वारूळे (वय ४२ वर्षे रा. धरणगाव, जिल्हा जळगाव) व अरूण त्र्यंबक पाटील (वय ५४ वर्षे, रा. कल्याण पश्चिम) अशी चलनातून बाद झालेल्या नोटांप्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे असून ते साईबाबा जकात नाका कडून भिवंडी शहरात येत असताना स्वयंसिध्दी कॉलेज समोरील रस्त्यावरून बॅग संशयीत रीतीने घेऊन जात असताना तपास पथकातील पोलिस उपनिरिक्षक बाबासाहेब मुल्ला व सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक शेळके यांना पेट्रोलिंग करताना आढळून आलेत्यांच्यावर संशय आल्याने त्यांना चौकशी कामी हटकले असता ते कावरेबावरे झाले त्यामुळे | त्यांच्याकडे चौकशी केली असता व त्यांच्याकडे असलेल्या बॅगेची | झडती घेतली असता बॅगमध्ये भारतीय चलनातून रदद करण्यात आलेल्या हजार रूपयाच्या ८ हजार व पाचशे रूपयांच्या ४ हजार नोटा असे एकूण एक कोटी मिळून आल्याने त्यांच्याविरोधात शांतीनगर पोलिस ठाणे येथे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक बाबासाहेब मुल्ला करित आहेत.
चलनातून बाद झालेल्याएककोटींच्या हजार पाचशेच्या जुन्या नोटा भिवंडीत जप्त