अपशकुन कोणाला, लोकप्रतिनिधी की आधकारी कर्मचा-याना

“विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली,


नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले,"


इतके अनर्थ एका अविद्येने केले. थोर विचारवंतांनी दिलेले हे बोधवाक्य आम्ही फक्त वाचतो दुस-याला सांगतो आणि आचरण मात्र शुन्य अशी अवस्था आज दिसून येत आहे. संपुर्ण देशभरामध्ये अंधश्रध्दा निर्मुलन विष्ट यकासाठी अतोनात प्रयत्न सुरू होते आणि सदरचे विधीयक हे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा बळी घेतल्यामळेच त्याची अंमलबजावणी होईल याची जाण असलेल्या लोकांनीच भिवंडी मनपामष्ट ये गिनीज बुकामध्ये नोंद करण्यासारखी गोष्ट घडवून आणली ती म्हणजे महानगरपालिकेचेगेट बंद पाडणे.


शासकिय कार्यालयांमध्ये कोणत्याही प्रकारचे देव देवता पुजू नयेत असा शासन निर्णय/अध्यादेश असतानासुध्दा शासन निर्णय फाटयावर मारण्यात सराईत असलेले लोकप्रतिनिधींनी पुन्हा एकदा वळणाचे पाणी वळणावरच जात असल्याचे दाखवून दिलेले आहे. भिवंडी मनपाचे आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांनी परवानगी दिलेली नसतानाच गेट बंद राहतातच कसे? ज्याला कोणाला अशांती वाटत असेल अपशकुन वाटत असेल त्याने महापालिकेत येणेच बंद करावे ना, ज्यांना गेट बंद करण्याची हौस होती त्यांनी महापालिकेमध्ये निवडणूका तरी का लढवाव्यात.


परंतू मनपाची इमारत ही आपले घर समजूनच आपली मक्तेदारी असल्यासारखे वागूनच गेट बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अपंग नागरिक व कर्मचा-यांना त्याचा नाहक त्रास होत आहे. आज रस्त्यांच्या कामासाठी होणा-या वाहतुक कोंडीमुळे जरी गेट खुले केले असतील तरी ते सदैव असेच सुरू ठेवण्याची अपेक्षा सर्वच नागरिक व कर्मचारी करताना दिसून येत आहे.


परंतू या गेट बंद ठेवण्यामागचे कारण समजून येत नाही. जो सध्या गेट चालू आहे तेथे विश्वरत्न डॉबाबासाहेबांचा पुर्णाक? ती पुतळा बसविण्याचे काम सुरु आहे. ज्यांनी कधी आयुष्यामध्ये बाबासाहेबांना वंदन केले नाही फक्त स्वस्वार्थासाठी बाबासाहेबांच्या अनुयायांना निवडणूकी पुरते बाटली आणि कोबडीच्या तंगडीत उतरवून आपली पोळी भाजून घेण्याचे काम केलेले आहे अशांना बाबासाहेबांचे दर्शन नकोसे वाटते म्हणून की काय हे पुढील प्रयोजन तर नाही ना असा काहीसा सुर ही आंबेडकरी अनुयायांमधून ऐकावयास मिळत आहे. अरे जर तमचे मनच शांत समाधानी नसेल तर असे कितीही गेट बंढ केलेच तरी शांती थोडीच लाभणार आहे कारण आपली कर्मच वाईट असल्यामुळे त्याची फळे ही तशीच मिळतात त्यामुळे माणसाला अशांती होते. यावर एक उपाय म्हणून भगवान बुध्दांनी सांगितले आहे की,


मानवी मनाचा केंद्रबिदू मन हेच आहे जर तुमचे मनावर नियंत्रण असेल तर तुमच्या जिवनामध्ये कोणतीही अशांती तमच्या बाजला उभी राहणारच नाही आणि मग असे गेट बंद करण्याची वेळ तुमच्यावर येणारच नाही यावरून असे दिसून येते की पूर्वीच्या असणा-या या बौध्दमय देशाला आज खरीभगवान बुध्दांच्या विचारांची गरज आहे यात मिळमात्र शंका नाहीच.