आंधळ दळतय कुत्र खातय

स्थानिक स्वराज्य संस्था असो की शासकिय निमशासकीय कार्यालये असोत, त्यामध्ये काही ना-लायक लोकांची भर्ती झालेली असते त्यातीलच काहीजण आपला | स्वाभिमान विकून इतरांचे तळवे चाटून अधिकारी कसे बनता येईल नेहमी याचाच विचार करत असतात आणि मग त्यावेळी पात्र असणा-या अधिकारी कर्मचा-यांना डावळून मला कसे पुढे जाता येईल, खुर्व्या कशा अडकवता येतील या प्रयत्नात असणारे काही ना-लायक असतात आणि अशांची पितळ उघडे पडले की मग काय करू आणि काय करू नये याचा विचार न करता आपली मती भ्रष्ट झाल्यासारखे वागून सन्माननीय न्यायालयाचीही दिशाभूल करून व न्यायालयाचाही वेळ घालवून आपली पोळी भाजण्याचे काम करीत असतात पण म्हणतात ना की खोटयाच्या कपाळी दसराच असतो कारण खोटे करणाराचे जास्त काळ टिकत नाही ते करत असताना प्रत्येकाने आपल्या अंतकरणामध्ये झाकून पाहीले पाहीजे आणि स्वतःला विचारले पाहिजे ही मी किती साफ आहे,। मीच चोर असतानाही समाजाला साव चा चेहरा दाखवण्यासाठी शिरजोर होणा-यांची संख्याही आजच्या युगात कमी नाही.


भिवंडी महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले रमेश थोरात यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने करमुल्यांकन विभागामध्ये आपले कर्तव्य पार पाडत असताना आपसात संगनमत करून दि. ०५/१0/ २0१५ ते दि. २३/१०/२0१५ रोजी किंवा त्या कालावधीत तीन मालमत्ताधारकांना आर्थिक फायदा पोहोचावा व स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता तीन मालमत्ता धारक यांचे अर्ज कर आकारणीसाठी प्राप्त झाल्याचे खोटया आवक क्रमांकाद्वारे दर्शवून त्या आधारे नियमबाहय बनावट प्रस्ताव तयार करून आकारणी नोटीस आदेशावर कार्यालयीन अंतर्गत आदेशाचे जावक क्रमांक दिलेले असताना त्याच जावक क्रमांकाचे बनावट कर आकारणीचे आदेश देऊन महानगरपालिका प्रशासनाची फसवणूक केली म्हणून त्यांचेवर मनपा प्रशासनाच्या वतीने निजामपुरा पोलिस स्टेशन भिवंडी मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. व या गुन्हयात थोरातांना अटक होवून न्यायालयामध्ये हजर केले असता दि. २७/02/20१८ ते दि. 03/03/20१८ रोजी पर्यंत ५ दिवसांची पोलिस कस्टडी रिमांड सुध्दा मंजूर झाली होती. आता पुन्हा तसाच नविन घोटाळा उघडकीस येतो की काय, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. कारण निवासी कराची आकारणी करून त्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कारखाने चालवून कराची चोरी केल्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी डॉ. सुनिल भालेराव यांच्या वसुली पथकाने उघडकीस आणण्याचे काम केले आहे.


भिवंडी शहर महानगरपालिकेच्या थकीत मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी प्रशासन विविध योजनांची अंमलबजावणी करून मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहीत करीत आहे मात्र असे असतानाच शहरात आज ही शेकडो मालमत्तांवर कर आकारणी न होताच शहरातील नागरी सुविधां चा वापर होत असल्याचे समोर आले आहे. पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी पालिकेच्या वसुली विभागाची जबाब दारी सहाय्यक आयुक्त डॉसुनिल भालेराव यांच्याकडे सोपविताच त्यांनी मागील तीन दिवसांपासून माल मत्ता कराच्या वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली असून त्यादरम्यान ही मालमत्ता कराची चोरी उघडकीस आली आहे. मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांच्या नेतृवाखाली सहाय्यक आयुक्त डॉ. सुनिल भालेराव यांनी प्रभाग समिती क्र.४ चे सहाय्यक आयुक्त शमीम अंसारीकार्यालय अधिक्षक संजय पुण्यार्थी, कर निरिक्षक सुधाकर पाटील, पर्यवेक्षक आर बी चन्ने, एम टी वळवी, लिपिक रमेश गायक वाड, गजानन पाटीलमहेंद्र निकम, आदींच्या पथकासह प्रभाग समिती चार अंतर्गत मालमत्तांच्या थकीत कराची वसुली मोहीम हाती घेऊन नारपोली येथील चौथानी कंम्पाउण्ड येथील मुश्ताक अहमद अब्दुल कादिर पटेल यांच्या मालकीच्या माल मत्ता क्र. ८0४, ८०५, ८१६, ८१७, ८३२ या यंत्रमाग कारखान्यांची तपासणी केली असता या मालमत्तां ची पालिका दप्तरी निवासी वापर म्हणून नोंद असून ८२२१ चौरस फुट मोजमाप असलेल्या सहा यंत्रमाग कारखान्यांची १ लाख ८७ हजार रूपये मालमत्ता कराची थकबाकी वसुलीसाठी गेले असता सहाय्यक आयुक्त डॉ. सुनिल भालेराव यांनी येथील सर्व यंत्रमाग कार खान्यांच्या मालमत्ता कराबाबत चौकशी कर ण्यास सुरूवात केली असता येथील या मालम त्तांची कर आकारणीच झाली नसल्याची धक्का दायक माहिती समोर आली आहे.


सदरच्या मालमत्ता सन १९८९ मध्ये इमारत वापर दाखल घेऊन वापरात आल्या असून प्रत्यक्ष जागेवर तब्बल ४0 यंत्रमाग कारखाने आढळून आले आहेत. त्यांचे मोजमाप हे तब्बल ८0 हजार चौरस फुट असल्याचे उघड झाले असून डॉ. सुनिल भालेराव यांनी ही बाब वरिष्ठांना कळवून येथील सर्व ४0 यंत्रमाग कारखाने सील करण्याची कारवाई केली आहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासून मनपाच्या भुभाग लिपिकांच्या ही बाब कशी लक्षात आली नाही. किंवा मालमत्ता नोंदणीच्या वेळी मालमत्ता विभागाच्या दी लक्षात या बाबी येत नाहीत की आपल्या स्वस्वार्थासाठी जाणीवपुर्वक चालतंय ना तर कशाला कडेवर घ्या, असा प्रकार सरू होता की काय म्हणून आयुक्तांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जेजे दोषी आहेत त्या सर्वांवर कारवाई करून त्यांचेकडन मालमत्ता कराची थकबाकी वसला करण्याची खरी गरज असल्याचे नाक्यानाक्यावर बोलले जात आहे. त्यामुळे पन्हा एकदा आंधळं दळतंय आणि कोपिट खातेय याची प्रचिती भिवंडी मनपाच्या कार्यप्रणालीवरून दिसून आली आहे