नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कायाकल्प पुरस्काराने सन्मान

ठाणे(जि.प.ज.अ):- ठाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत केंद्र शासनाच्या गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाअंतर्गत नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांना सोमवारी नियोजन भवन येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हास्तरीय कायाकल्प पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये भिवंडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र अनगावला प्रथम पुरस्काराने सन्मानित कर ण्यात आले तर उर्वरित आठ प्राथ मिक आरोग्य केंद्रांना प्रशंसात्मक पुरस्कार मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आले. ___ यावेळी ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी ब भि नेमाने, उपमुख्य कार्यकारी(प्रशासन) डी. वाय. जाधव, आरोग्य व बांधकाम समिती सभापती वैशाली चंदे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सपना भोईर, समाज कल्याण समिती सभापती संगीता गांगड, कृषी-पशू-दुग्धशाळा समिती सभापती किशोर जाधव, प्रकल्प संचालक डॉ. रूपाली सातपुतेमुख्यलेखा व वित्त अधिकारी गीता नायर, जिल्हा आरोग्य अधि कारी डॉ. मनिष रेंगे, व्यासपि ठावर उपस्थित होते. हे पुरस्कार रूग्णालयाची देख भाल, स्वच्छता, जैविक व्यवस्था पन, जंतूसंसर्ग व्यवस्थापन, सपोर्ट सर्विसेस, स्वच्छता प्रसाररूग्णालय बाहेरील स्वच्छता आदी सात निकष पुर्ण करणा-या प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आले. यामध्ये भिवंडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र दाभाड, दिवा अंजूर, मुरबाड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र धसई, शिरोशी, शहापू तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शेणवा, वाशिंद, अंबरनाथ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य वेंद्र बदलापूर, कल्याण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र खडवली, आदी प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रशंसात्मक पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेयावेळी जिल्हा परिषद सदस्यखातेप्रमुख, आरोग्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.