कल्याण(प्रतिनिधी):- नोबेल पुरस्कार विजेते थोर भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही. रमन यांनी लावलेल्या रमन इफेक्ट या शोधा चे स्मरण म्हणून देशभर २८ फेब्रु वारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो. __ महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या वतीने सुध्दा हा दिवस साजरा केला जातो. अंनिस कल्या ण शाखेतर्फे हा उपक्रम दिनांक २९ फेब्रुवारी २०२० रोजी राबविला जाणार आहे. त्यानिमित्त वैज्ञानिक दृष्टीकोन आणि घटनेतील मुल्ये या विषयावर व्याख्यानातून संवाद साधण्यासाठी गीता महा शब्दे, संचालक नवनिर्मिती लर्निंग फाउण्डेशन पुणे व गणित शिक्षण तज्ञ यावेळी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम पु.ल.कटटा, सुभाष मैदानातील तारांगण बाग, आचार्य अत्रे रंगमंदिराजवळ, कल्याण पश्चिम येथे २९ फेब्रु वारी रोजी सायंकाळी ६.३० ते ९.०० दरम्यान होणार आहे. तरी सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे व या व्याख्यानाचा लाभ घ्यावा अशी आवाहनवजा विनंती अंनिस तर्फे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती कल्याण शाखेतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमाचे आयोजन